एका न्यायमूर्तीची व्यथा : मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकण्याचा उद्योग करीत आहे. परंतु माझ्याही स्वभावाला औषध नाही. त्याला मी काय करू?

मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकण्याचा उद्योग करीत आहे. परंतु माझ्याही स्वभावाला औषध नाही. त्याला मी काय करू? लहानपण मी महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या व मंतरलेल्या वातावरणात घालविले. हिमालयाच्या उंचीच्या व्यक्ती बघितल्या. आता पंगू व ठेंगण्या व्यक्ती बघत आहे. त्यांच्यासोबत जगतही आहे. मीही त्यांच्यातला एक आहे. तरीही मन मानत नाही. समझोते करू इच्छित नाही. त्याला माझा नाईलाज आहे.......